Posted by NOKARI MAHITI on Saturday, 3 November 2018
Label:
LATEST JOB,
Label:
Nokari
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या यशवंतराव चव्हाण
स्मृती रुग्णालयाकरिता हंगामी विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार
पात्रताधारक इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
ब्लड बँक टेक्निशिअन पदाच्या ३ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी./ डी.एम.एल.टी. उत्तीर्ण असावा.
ब्लड बँक कॉन्सिलर पदाची १ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस.डब्ल्यू. कोर्स उत्तीर्ण असावा.
एमएसडब्ल्यू पदाच्या २ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस.डब्ल्यू. कोर्स उत्तीर्ण असावा.
डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या ५ जागा शैक्षणिक पात्रता
– उमेदवार बारावी उत्तीर्णसह इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी
टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र अर्हताधारक असावा.
डायलेसिस टेक्निशिअन पदाच्या ३ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार इयत्ता दहावीसह डायलेसिस कोर्स उत्तीर्ण असावा
फार्मासिस्ट पदाच्या ५ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी उत्तीर्णसह बी.फार्म/ डी.फार्म अर्हताधारक असावा.
एक्स-रे टेक्निशिअन पदाच्या ५ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी उत्तीर्णसह एक्स-रे टेक्निशिअन कोर्स उत्तीर्ण असावा.
स्टाफ नर्स (GNM) पदाच्या ९१ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावीसह GNM कोर्स किंवा B.Sc (नर्सिंग) उत्तीर्ण असावा.
लॅब टेक्निशिअन पदाच्या ३ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावीसह डी.एम.एल.टी. उत्तीर्ण असावा.
कक्ष मदतनीस (पुरुष) पदाच्या ५ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार सातवी उत्तीर्ण आणि रुग्णालयीन कामाचा अनुभव असलेला असावा.
कक्ष मदतनीस (स्त्री) पदाच्या ५ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार सातवी उत्तीर्ण आणि रुग्णालयीन कामाचा अनुभव असलेला असावा.
नोकरीचे ठिकाण – पुणे (पिंपरी-चिंचवड)
परीक्षा फीस – नाही
मुलाखतीची तारीख – १३, १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ (सकाळी १० वाजता)
मुलाखतीचे ठिकाण – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील चाणक्य प्रशासकीय कार्यालयाशेजारील हॉल, पिंपरी, पुणे.
टीप – मुलाखतीस येताना सर्व कागदपत्रे सोबत घेऊन यावे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.