Posted by NOKARI MAHITI on Friday, 16 August 2019
Label:
JOB,
Label:
LATEST JOB,
Label:
Maharashtra,
Label:
Nokari
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत अभियंता (शिकाऊ) पदांच्या ३६९ जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील बांधकाम अभियंता (पदवी/ पदविका) आणि वितरण अभियंता (पदविका) प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्थापत्य अभियंता (पदवी) पदांच्या २८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० ऑगस्ट २०१९ रोजी ३५ वर्षापर्यंत असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
स्थापत्य अभियंता (पदविका) पदांच्या १४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० ऑगस्ट २०१९ रोजी ३० वर्षापर्यंत असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
वितरण अभियंता (पदविका) पदांच्या ३२७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार विद्युत अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० ऑगस्ट २०१९ रोजी ३० वर्षापर्यंत असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.
परीक्षा – ऑगस्ट २०१९ मध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ सप्टेंबर २०१९ आहे.