तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण ४०१४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण ४०१४ जागा
लेखापाल, सहायक (मनुष्यबळ), सचिवालय सहाय्यक, कोपा, ड्राफ्ट्समन (बांधकाम), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान प्रणाली देखरेख, वेल्डर, मशिनिष्ठ, यांत्रिक (मोटर वाहन), यांत्रिक (डिझेल), रेफ्रिजेटर & एसी मेकॅनिक, सर्वेक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट), बांधकाम, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम. किंवा बीए/ बीबीए किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण किंवा बी.एस्सी./ आयटीआय (लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) किंवा कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २८ मार्च २०१९ रोजी १८ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि ३ वर्ष सवलत.
परीक्षा फीस – नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ मार्च २०१९ ( सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.